मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हेंटिलेटर,बिपअप व नेब्युलायझर मशीनचे वाटप

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा भाईंदर महापालिकेच्या टेंभा व प्रमोद महाजन कोव्हीड रुग्णालयात व्हेंटिलेटर, बिपअप व नेब्युलायझर मशीन आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वाटप

मीरा भाईंदर  – कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढल्याने रुग्णालयात अपुऱ्या पडणाऱ्या यंत्रसामुग्री मुळे अनेक रुग्णांचे हाल होत होते. या कोरोना महामारीच्या काळात तिसऱ्या लाटेची संभावना वाटत असल्याने याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या टेंभा कोव्हीड रुग्णालयात २ व्हेंटिलेटर, २० बिपअप व २० नेब्युलायझर मशीन, ५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे तसेच प्रमोद महाजन कोव्हीड रुग्णालयात १ व्हेंटिलेटर, ५ बिपअप व १० नेब्युलायझर मशीन आणि ५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वाटप आज करण्यात आले या प्रसंगी  आमदार  गीता जैन,  जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे,  विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर, गटनेते नीलम ढवण, विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रताप सिंग, शहर प्रमुख प्रशांत पलांडे, लक्ष्मण जंगम, शंकर वीरकर, पप्पू भिसे, मनिष मेहता, जयराम मेसे, उपशहर प्रमुख भगवान शर्मा, महिला उपशहर संघटक तेजस्वी पाटील नगरसेवक, तारा भगत, शर्मिला बगाजी, अनंत शिर्के माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद नगरसेविका कुसुम गुप्ता, वंदना पाटील तसेच महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त संजय शिंदे, मारुती गायकवाड, सहायक आयुक्त सचिन बच्चाव इत्यादी उपस्थित होते.

खासदार राजन विचारे यांनी या कार्यक्रम प्रसंगी महाड व चिपळूण मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकाचे सफाई कर्मचारी वृंद, अविश्रांत परिश्रम घेत आहेत. या कर्मचाऱ्यांना, वॉशिंग टँकर, सक्शन मशीन व आदी साधन सामग्री पुरवण्यात आली आहे. यामुळे चिखलाची आणि घाणीची समस्या मार्गी लागत आहे. तरी त्यांना मदतनीस म्हणून मीरा-भाईंदर महापालिकेनेही ५ ते ६ दिवस आपल्या सफाई कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना पाठविण्याची विनंती त्यावेळी करण्यात आली. तसेच कोव्हीड काळात दिवस-रात्र काम करणारे मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले व सहाय्यक आयुक्त सचिन बच्चाव यांचा सत्कार करून कौतुक केले व वैद्यकीय विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांना नुकताच कोव्हीड काळात उत्कृष्ट काम केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामार्फत कोव्हीड संजीवनी हा पुरस्कार प्रदान केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

 299 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.