सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करा भाजप महिला मोर्चाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे – ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून सध्या अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु आहे. परंतु अशी बांधकामे उभी कशी राहिली, त्यांना वीज, पाणी, शौचालये आदींसह इतर सोई सुविधा कोणी दिल्या याचा उहापोह पालिका करणार आहे का? असा सवाल भाजपच्या ठाणे  शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक पाहता या अनाधिकृत बांधकामांना पाठबळ देणाऱ्या सहाय्यक आयुक्तांच्या किंवा अधिकार्यांच्या केवळ बदल्या करुन उपयोग नाही शासनाचा देखील असा GR आहे की अनधिकृत बांधकामांसाठी अधिकार्याना दोषी धराव,आणि म्हणूनच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी  देखील त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

अनाधिकृत बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे मात्र ही अनाधिकृत बांधकामे होण्यामागे सहाय्यक आयुक्त महापालिका अधिकारी हे देखील तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे ज्या ज्या प्रभाग समितीत अशा प्रकारे अनाधिकृत बांधकामे अधिक प्रमाणात झालेली असतील त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या अशिकार्याना दोषी ठरवून त्यांची केवळ बदली नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी देखील पेंडसे यांनी केली आहे.

ज्या वेळेस अशा प्रकारे प्रभाग समितीमध्ये अनाधिकृत बांधकामे होत असतात, त्यावेळेसच सहाय्यक आयुक्तांनी ती रोखली पाहिजे होती, त्यांना वीज, पाणी, टॅक्स लावणे देखील अयोग्य आहे. परंतु महापालिकेच्या आशिर्वादशिवाय या सोई सुविधा देखील मिळणे शक्य नाही. त्यामुळेच अशा सहाय्यक आयुक्तांना आधी निलंबीत करणो गरजेचे आहे.

 322 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.