मुब्रा बायपासला खड्डा 

ठाणे – लोकमान्य नगर आणि मुंब्रा ठाकूर पाडा येथे पडलेल्या खड्ड्यांचा घटना ताज्या असताना, बहुचर्चित असलेल्या मुंब्रा बायपास या रस्त्याला खड्डा पडल्याची बाब समोर आलेली आहे .हा खड्डा ४ ते ५ फुटांचा असून या खड्डयामुळे लोखंडी सळईची जाळी दिसत आहे. तर या रस्त्यावरील पडलेल्या खड्डयांची कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी साधारण तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कामामुळे ठाण्याकडे येणारी अवजड वाहतुक तीन ते चार दिवस बंद ठेवली जाणार आहे. ती वाहतूक पर्यायी मार्ग वळविण्यात आली आहे. पण, वेळीच ही घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

 369 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.