मुंबई – करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे.
करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन दिवसांत लोकलसंबंधी निर्णय घेऊ शकतो असंही म्हटलं आहे.
“११ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचं प्रमाण अद्यापही जास्त असल्याने तेथील निर्बंध शिथील केले जाणार नाही. इतर जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत जे काही तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत ते शिथिल करण्यासंबंधी आरोग्य विभागाच्या आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या सूचना मिळून मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवत आहोत. मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
590 total views, 1 views today