तळिये गावचा पुनर्विकास म्हाडा करणार गृहनिर्मणमंत्री आव्हाड यांची घोषणा

कोकणात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बाधितांचे तळिये गाव बसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे अशी घोषणा आव्हाड यांनी केली आहे. 

मुंबई – काळाने घाट केला डोंगर कोसळून महाड तालुक्यातील तळिये गाव उदवस्थ झालं.गावातील ३२ घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ४० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळिये गावची परिस्थिती पहिली.  त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. 

‘कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती’, असं ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तळिये गावचा पुनर्विकास म्हाडा करणार गृहनिर्मणमंत्री आव्हाड यांची घोषणा  डॉ.जीतेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बाधितांचे तळिये गाव बसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे अशी घोषणा आव्हाड यांनी केली आहे. 

 365 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.