पडघ्यातील हत्येच्या गुन्ह्याचा झाला उलगडा

बहिणीबरोबर असलेल्या संबंधातून त्यांनी रचना हत्येचा कट

ठाणे –  पडघा सापेगाव येथील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन, कोणताही धागेदोरा नसतांना अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून त्याची हत्या करणाऱ्या दोघांना ठाणे  ग्रामीण पोलीसांनी मोठय़ा शिताफीने अटक केली आहे. मयत तरुणाचे हत्येतील अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबध होते, त्यातूनही ही हत्या करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पडघा सापे गावचे हद्दीत ७ जुलै रोजी सुप्रीम कंपनीकडे जाणाऱ्या रस्ताच्या कडेला एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारधार शस्त्रने गळा कापुन त्याची हत्या करुन रस्त्याच्या कडेला चारीमध्ये मृतेदह ढकलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे  ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास लावण्यास सुरवात केली. त्यानुसार ठाणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदार मार्फत प्रथम अथक परिश्रम घेवुन मयत याचे प्रेत कुजलेले असतानाही त्याची ओळख पटवली. त्यानुसार मयत हा उल्हासनगर नं. ५ येथे राहणारा दिलीपकुमार रामचंद्र पाल (२२) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत हिल लाईन पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही दाखल असल्याचे दिसून आले.

परंतु या हत्येमागे नेमके कारण काय असेल किंवा या प्रकरणाचा कोणताही पुरावा नसतांना ठाणो ग्रामीण पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. त्यानुसार विजय मुलचंद प्रजापती (२४) उल्हासनगर नं. १ आणि अंकीत अमृतलाल परमार (४६) डोंबिवली पूर्व यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार मयत दिलीपकुमार याचे  आरोपी विजय प्रजापती याच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याचा राग मनात धरुन त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार आता त्यांनी पुढील तपासासाठी पडघा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, ठाणो ग्रामीणचे सुरेश मनोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनिरी भास्कर जाधव, पो.हवा/ प्रकाश साईल आदींसह इतर पथकाने उघडकीस आणला.

 640 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.