दुकाने उघडण्यास परवानगी दिली नाहीतर महाराष्ट्रभर आंदोलन करू

दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास महाराष्ट्रभर आंदोलन उभारणार
व्यापाऱ्यांनी दिला इशारा

ठाणे – मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांनी देखील आक्रमक पावित्र घेतला आहे. त्यानुसार खाद्य पदार्थाची दुकाने रात्री ११ वाजेर्पयत सुरु असतात. मात्र इतर दुकाने दुपारी ४ वाजताच बंद होत आहेत. परंतु आता कोरोना नियमांचे पालन करुन इतर आस्थापनांची दुकाने देखील रात्री ८ वाजेर्पयत सुरु करण्याची परवानगी मागूनही ती न दिल्याने गुरुवारी ठाण्यातील व्यापा:यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकाराच्या विरोधात आंदोलन केले. तसेच यापुढेही राज्य शासनाने दुकाने रात्री ८ वाजेर्पयत सुरु ठेवण्यास परवानगी दिली नाही तर संपूर्ण राज्यात आंदोलन उभे केले जाईल असा इशारा ठाण्यातील व्यापाऱ्यांनी दिला आहे.

गुरुवारी सकाळी शासकीय विश्रमगृह ठाणो येथे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरु द्ध ठाणे  शहरातील सर्वच व्यापारी वर्ग एकत्र येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकार एक बाजूला इ कॉर्मसला पूर्ण दिवस व्यवसाय करायला परवानगी देते आणि ज्या व्यापाऱ्यांमुळे रोजगार निर्मिती होते, त्यांना दुपारी ४ वाजता दुकाने बंद करायला सांगत आहेत. मागील १६ महिन्यापासून व्यापारी पूर्णपने त्रसलेले आहेत. व्यापार करणो हा आमचा हक्क आहे. तो आमच्याकडून हिरावून घेऊ नका. व्यापाऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे, लोन चे हप्ते सरकारचे सर्व प्रकारचे कर हे सगळं करताना व्यापारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे रात्री ८ वाजेर्पयत दुकाने सुरु ठेवण्याची मुबा द्यावी या मागणीसाठी गुरुवारी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

सरकार व्यापाऱ्यांबरोबर दुपट्टी व्यवहार करीत आहे. सरकारने आमची दुकान पूर्ण दिवस सुरू करावी ही मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन मोठया प्रमाणात करण्यात येईल अशी माहिती व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा यांनी पत्नकारांना दिली. या आंदोलनाला ठाणो शहरातील व्यापरीवर्ग, दुकानात काम करणारे कामगार उपस्थित होते. त्याच बरोबर भाजपचे आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे आदींनी देखील हजेरी लावून या आंदोलनाला पाठींबा दिला.

 295 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.