क्लस्टर’ ला ‘एस.आर.ए.’ होऊ देऊ नका – संजय केळकर

ठाणे – क्लस्टर डेव्हलपमेंटचा क्रांतिकारी निर्णय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.  त्याची अंमलबजावणी जर नीट केली नाही, तर क्लस्टरचे एस.आर.ए. होईल, ती होऊ देऊ नका असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी राबोडी येथील “जन की बात” या कार्यक्रमात केले.  

भाजपतर्फे आयोजित या कार्यक्रमाला खासदार विनय सहस्त्रबुध्दे, आमदार व ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे, ज्येष्ठ नगरसेवक मिलींद पाटणकर, कृष्णा पाटील, नंदा पाटील,  दिपा गावंड, महिला माजी प्रदेश अध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश चिटणीस संदीप लेले आदी उपस्थित होते. राबोडी येथील रहीवासीयांनी क्लस्टर बाबत अनेक प्रश्न, समस्या, शंका उपस्थित केल्या. त्याचे उत्तर देताना  केळकर यांनी रहिवाशांच्या पाठीशी ठाणे भाजप खंबीरपणे उभे असून क्लस्टर प्रकल्प राबवताना अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले. 

या कार्यक्रमाला नागरीकांनी पाणी विषय, पार्कींग, अनधिकृत बांधकाम, नाले – गटारे, अतिक्रमणित फुटपाथ, शैक्षणिक अशा विविध विषयांवर आपल्या समस्या मांडल्या तर राबोडीतील गाजलेल्या जमिल शेखच्या हत्येसंदर्भात त्यांचे कुटुंबियांनी उपस्थित राहून न्याय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले.

 294 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.