महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? काँग्रेसचा सवाल

अनाधिकृत इमारतीत असलेल्या बारवर तोडक कारवाई करा; अनाधिकृत बांधकामात दोषी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

ठाणे – ठाण्यात सांयकाळी ४ नंतरही लेडीज बार सुर असल्याचे उघडकीस आल्यानंतर दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई झाली. परंतु ही जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे, तेवढीच जबाबदारी ही महापालिकेची देखील असल्याने अशा बारवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या किंबहुना छोटी मोठी दुकाने बंद करुन आपली हुशारकी दाखविणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर आता कारवाई व्हावी अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसने केली आहे. तसेच अनाधिकृत बांधकामांवर धातुर-मातुर कारवाई करुन ही बांधकामे उभी राहण्यास पाठबळ देण्यात हेच पालिका अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त जबाबदार असल्याने त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विविध आस्थापना सांयकाळी ४ नंतर बंद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परंतु ठाण्यात सांयकाळी चारनंतरही लेडीज बार सुरु असल्याचे उघडकीस आले असून त्यानुसार पोलीस आयुक्तांनी ज्या ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे बार सुरु होते, अशा पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. परंतु यात केवळ पोलीस अधिकारीच दोषी आहे, हे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. या लेडीज बारला पाठबळ देणारे पालिकेतील देखील अधिकारी आहेत. सांयकाळी चार नंतर छोटी,मोठी दुकाने याच अधिकाऱ्यांकडून बंद करण्यात येत आहेत. परंतु त्यांना सांयकाळी चार नंतर सुरु असणारे बार दिसले नाही का? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पालिका अधिकारी देखील तितकेच दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. त्यातही हे लेडीज बार किंवा बार हे अनाधिकृत इमारतीत असतील तर त्यावर देखील कारवाई ही झाली पाहिजे अन्यथा त्या विरोधात देखील आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही चव्हाण यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

शहरात मागील काही महिन्यात कोरोनाच्या नावाखाली शेकडो अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर केवळ छोटय़ा मोठय़ा अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा फार्स करण्यात आला. पंरतु मोठी अनाधिकृत बांधकामे आजही तशीच आहेत, त्यांच्यावर कावराई व्हावी यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषण देखील केले होते. परंतु अद्यापही त्या बांधकामावर कारवाई का होत नाही. असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातही अशा बांधकामांना किंबहुना अशी बांधकामे होऊ देण्यात पालिकेतील अधिकारीच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्चित करावी अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली आहे.

ज्या प्रभाग समितीत अनाधिकृत बांधकामे वाढली असतील त्या ठिकाणी त्या त्या प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच लेडीज बार प्रकरणात केवळ पोलीसच जबाबदार नसून पालिका अधिकारी देखील तितकेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी आणि ते बार जर अनधिकृत इमारतीमध्ये असतील तर अशा बारवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. 

 265 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.