डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा

डोंबिवली – डोंबिवलीजवळील उंबर्ली हे गाव कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.मात्र आता  डोंबिवलीत पेंडसे नगर परिसरात एक पांढऱ्या रंगाचा कावळा वावरताना डोंबिवलीतील नागरिकांना आढळून आल्याने सर्वाना आश्चर्य वाटत आहे.पॉज संस्थेला याची माहिती मिळाल्यावर पांढऱ्या रंगाच्या कावळ्याला पोज संस्थेच्या मुरबाड येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्वेकडील महेश वीला, आंध्र बँक जवळ पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. तेव्हा हितेश शहा ह्यांना आढळून आला.त्यांनी पॉज हेल्पलाईना  फोन केला.संस्थेचे निलेश भणगे यांनी त्वरित धाव घेत त्याला बाकी  कावळ्याच्या पांढऱ्या रंगाचा कावळ्याला मारातून वाचवले. शहा यांच्या घराजवळ येणाऱ्या पाखरांमध्ये  एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले.कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केलं, तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण चोच आणि डोळे हे कावळ्या सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली अशी माहिती पॉज संस्थेतर्फे देण्यात आली.अशा प्रकारचा कावळा क्वचितच आढळतो. पांढरा कावळा ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे.पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात.ही रंगद्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात.या तीनही रंगद्रव्यांची कमी – जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते असे पॉजचे संचालक निलेश भणगे यांनी सांगितले.यापैकी मेलानिनचा या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पिसे पूर्ण पांढऱ्या रंगाची होतात. कावळ्याबाबत असे झाले असावे, असे पक्षीमित्र निलेश यांनी सांगितले.

 341 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.