तब्बल 10 वर्षानंतर वारकऱ्यांना मिळाले हक्काचे वारकरी भवन – खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

वारकरी संप्रदायाचे दैवत श्री विठूरायाच्या आषाढी वारीचे वेध लागले असून शेकडो वर्षापासून पायदळ वारीची परंपरा गेल्यावर्षी कोविड-19 मु ळे मोडीत निघाली. खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात ठाणे महानगरपालिके मार्फत उभे राहिलेल्या वारकरी भवनाच्या इमारतीतील ताबा घेण्यासाठी गेल्या १० वर्षापासून वंचित असणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या वारकरी भवनाचा ताबा मिळण्यासाठी देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकरी भवनाचे उद्घाटन नामदार मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब मंत्री नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग पालकमंत्री ठाणे जिल्हा व गडचिरोली यांच्या शुभहस्ते व महापौर मा. श्री. नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी ह. भ. प. गुरुवर्य श्री. माधव महाराज घुले मठाधिपती इगतपुरी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, गटनेते दिलीप बारटक्के, परिवहन सभापती विलास जोशी, ठाणे जिल्हा महिला आघाडी मीनाक्षी शिंदे, महिला संघटक वंदना डोंगरे, स्मिता इंदुलकर, नगरसेविका नंदिनी विचारे, मालती रमाकांत पाटील, प्रियांका अविनाश पाटील, पद्मा यशवंत भगत, प्रभा बोरीटकर, नगरसेवक नरेश मणेरा, प्रकाश शिंदे, भूषण भोईर, नरेंद्र सूरकर, गणेश कांबळे, परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी नगरसेवक विलास सामंत, भास्कर पाटील, मंदार विचारे, श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ ठाणे चे अध्यक्ष श्री. दिनकर पाचंगे, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे चे अध्यक्ष आसावरी फडणीस, उपाध्यक्ष प्रकाश दिघे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे प्रमुख कार्यवाहक नरेंद्र बेडेकर, वारकरी संप्रदायातील माउली सेवा मंडळ ठाणे व विश्व वारकरी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष विलास फापाळे आणि वारकरी, इतर शिवसेना व युवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे शहरातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जात असत. ठाणे शहरात वारकऱ्यांची संख्या अधिक असल्याने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ठाणे शहरात वारकरी भवन होण्याची इच्छा होती. खासदार राजन विचारे त्यावेळी तत्कालीन नगरसेवक असताना त्याचा पाठपुरावा करून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संत गजानन महाराज चौक, राम मारुती रोड, नौपाडा येथे वारकरी भवनाच्या इमारतीची निर्मिती करण्यात आली. या कामाचे भूमिपूजन सन २००७ साली हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते, त्यानंतर तयार झालेल्या इमारतीचे लोकार्पण १९ डिसेंबर २०११ रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते, परंतु शहर विकास विभागाकडे ताबा न मिळाल्याने इमारत तयार होऊन देखील धूळ खात पडली होती. सदर वारकरी भवनाच्या इमारतीतील पहिला मजला ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे, दुसरा मजला श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ ठाणे व तिसरा मजला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा या संस्थांना देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने दिनांक २० ऑक्टोंबर २०१६ रोजी एकमताने ठराव करण्यात आला होता. परंतु सन २०१७ ला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारती धोकादायक झाल्याने न्यायालयीन कामकाजासाठी महानगरपालिकेने वारकरी भवनाची इमारत ६ ते ८ महिन्याच्या मुदतीवर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाला देण्यात आली होती. वारकरी भवनाच्या इमारतीतील पहिला मजल्यावर न्यायालीन दस्तावेज ठेवल्याने पहिल्या मजल्याचा ताबा मिळेपर्यंत तळमजला व तिसरा मजला श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, दुसरा मजला ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांना गडकरी रंगायतन येथे तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची ताबा पावती देण्यात आली आहे.
खासदार राजन विचारे यांचे वारकरी संप्रदायवरील असलेले प्रेम लक्षात घेता दिनांक १८ जून २०२१ रोजी प्रमुख न्यायाधीश ठाणे जिल्हा सत्र न्यायालय मा. श्री. जोशी यांना ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन कुमार शर्मा यांच्या सोबत श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ ठाणे, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रतिनिधित्व करणारे शिष्टमंडळ न्यायाधीशांना भेटले होते. त्यावेळी वारकरी भवनातील पहिल्या मजल्यावरील जागा आम्ही लवकरात लवकर रिकामी करू असे आश्वासन देण्यात आले आहे.
या उद्घाटन प्रसंगी खासदार राजन विचारे समस्त वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे वारकरी भवनाचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल खा. विचारे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या वारकरी भवनाच्या माध्यमातून अधिकाधिक संप्रदायाचा वारसा जोपासण्याचे काम पुढील पीढीमार्फत सुरु राहील असे मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब मंत्री नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालकमंत्री ठाणे जिल्हा यांनी प्रतिपादन केले.

 457 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.