केंद्र शासनाच्या विरोधासह ओबीसी आरक्षणासाठी कॉग्रेसचे ठाण्यात धरणे आंदोलन

ठाणे – सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनाचे चुकेचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे.ते परत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.केंद्र शासन म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा,असे असून राज्यघटना संपुष्ठात आणण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप ठाणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी येथील काँग्रेस आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करते वेळी केला.

येथील शासकीय विश्रामगृहा समोर काँग्रेसने शनिवारी धरणे आंदोलन करून केंद्रातील भाजपा सरकारच्या कारभाराचा निषेध केला.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार छत्रपती शाहू महाराज, यांच्या जयंती निमित्ताने व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून ठाणे शहर काँग्रेस कमिटीने शनिवारी हे धरणे आंदोलन करून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला.मोदी सरकारची सात वर्षीय जुलमी कारकीर्द,एक तर्फी घेतलेले अन्यायकारक निर्णय म्हणजे एक प्रकारची अघोषित आणीबाणीच असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण,यांच्यासह प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी केला आहे.ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,सेवादल अध्यक्ष शेखर पाटील,प्रदेश सदस्य सुखदेव घोलप,जे.बी.यादव,भालचंद्र महाडिक आदि नेते उपस्थित होते.

 या धरणो आंदोलनातील काही काँग्रेस कार्यकत्र्यानी काळे कपडे परिधान करून केंद्र शासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे,ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे- नाही कोणाच्या बाप्पाचे, ओबीसींचे आरक्षण परत करा, नाही चालणार,नाही चालणार – मोदींची हुकूमशाही नाही चालणार आदी विविध घोषणांचे पोस्टर घेऊन काँग्रेस अध्यक्ष चव्हाण यांच्यासह महेंद्र म्हात्रे,ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिंदे,निलेश अहिरे,राजू शेट्टी,श्रीकांत गाडीलकर, महिला अध्यक्षा शिल्पा सोनोने,ओ.बी.सी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे,प्रवक्ते रमेश इंदिसे,झिया शेख,शिरीष घरत,गिरीश कोळी,रेखा मिरजकर,प्रसाद पाटील,बाबा शिंदे,हिन्दुराव गळवे,स्वप्नील कोळी,धर्मवीर मेहरोल,प्रवीण खैरालाया,शितल आहेर,अंजनी सिंग,अरूण राजगुरू,रामभाऊ परदेशी,उमेश सिंग,बाबा घाग,शंभू राठोड महिला काँग्रेसच्या हेमांगी चोरगे,सुप्रिया पाटील,भारती जाधव,मीनाक्षी थोरात,शकीला शेख,मैरूनिसा खान आदिनी जोरदार निदर्शने केली.या आंदोलनात  काँग्रेसचे जेष्ठ,कनिष्ठ पदाधिकारी, सदस्य ब्लॉक अध्यक्ष,काँग्रेस सेवादल,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,एनएसयुआयसह सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 319 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.