ठाणे – ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ४६२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २९ हजार ८०० रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ५९६ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात १३१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३२ हजार ७५० झाली आहे. शहरात एका मृत्यूंची नोंद आहे. तर कल्याण – डोंबिवलीत ७२ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूची नोंद नाही. नवी मुंबईत १३७ रुग्णांची वाढ झाली असून ७ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये २ रुग्ण सापडले असून १ मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत ६ बाधीत असून एका मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये ५२ रुग्ण आढळले असून २ मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ९ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ४० नवे रुग्ण वाढले असून २ मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३८ हजार ९५० झाली असून आतापर्यंत ११७१ मृत्यूंची नोंद आहे.
654 total views, 1 views today