राष्ट्रीय लोकन्यायालयाचे १ ऑगस्ट रोजी आयोजन

ठाणे –  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार रविवार,  दि. १ ऑगस्ट २०२१ आणि शनिवार, दि २५ सप्टेंबर २०२१ रोजी अनुक्रमे राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये माननी आर.एम. जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि १ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १.३० वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी  स्वरूपात, तडजोडीस पात्र फौजदारी  स्वरुपाची  १३८ एन.आय.ॲक्ट (चेक संबंधीची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी  तडजोडीसाठी  ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण सदरील संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांचेकडे अर्ज करावा.

सर्व पक्षकारांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय लोकअदालतीबाबत कोणतीही समस्या असेल व कोणतीही चौकशी करायची असल्यास  वाशी, नवी मुंबई जिल्हा ठाणे  दूरध्वनी क्रमांक ०२२-२७५८००८२, भिवंडी, जिल्हा ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२५२२-२५०८२८,  कल्याण जिल्हा ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२५१-२२०५७७०, मुरबाड जिल्हा ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२५२४-२२२४३३,  शहापूर, जिल्हा ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२५२७-२७०७७६,  उल्हासनगर, जिल्हा ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२५१-२५६०३८८, पालघर जिल्हा पालघर दूरध्वनी क्र. ०२५२५-२५६७५४, वसई, जिल्हा पालघर दूरध्वनी क्र.०२५०-२३२५४८४, वाडा जिल्हा पालघर दूरध्वनी क्र.०२५२६-२७२६७२, डहाणू, जिल्हा पालघर दूरध्वनी क्र. ०२५२८-२२२१६०,  जव्हार, जिल्हा पालघर दूरध्वनी क्र. ०२५२०-२२२५६५ क्रमांकावर चौकशी करावी.

सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा फोन नंबर ०२२-२५४७६४४१, द्वारे संपर्क साधावा. सर्व पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरिता व आपले दुरावलेले संबंध पुर्नस्थापीत करणेसाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन एम.आर.देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांनी केले आहे.

 338 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.