वाफगावचा होळकर वाड्याचे  होणार स्मारक  धनगर प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश

पुरातत्व विभाग,पुणे यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांना सादर केला प्रस्ताव

ठाणे  –  पुण्यातील वाफगाव येथील आद्य स्वातंत्र्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर जन्मस्थान असलेल्या होळकर वाड्याला राज्य  संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून मागणी करण्यात आली होती याची दखल शासनाने  घेतली असून कारवाई सुरु केली आहे

या वाड्याची दुरावस्था झाली असून  ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर होता. शासनानेही या वाड्याकडे दुर्लक्ष केले होते. आणि म्हणूनच  धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे हा वाडा राज्य संरक्षित स्मारक व्हावा या साठी  शासनाच्या  पुरातत्व व वस्तुसंग्रहालये  संचालनालय यांच्याकडे आपले सरकार ऍप्सवरून २६ जुलै २०१९ रोजी मागणी केली होती. तसेच मागणीचा  विचार झाला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असेही पत्रात म्हंटले होते. याची दाखल घेत पुरातत्व विभाग पुणे यांनी यशवंतराव होळकर वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेकामी आवश्यक कारवाई सुरु केली होती. परंतु आवश्यक असलेल्या दस्तावेजा अभावी कामात स्थगिती आली होती. यासाठी  धनगर प्रतिष्ठाने पाठपुरावा करण्यात आला.  किल्ला संरक्षित स्मारक करण्याकरिता आवश्यक असलेले दस्तावेज प्राप्त झाल्यावर तसा प्रस्ताव पुरातत्व विभाग,पुणे यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर केला आहे . याची दाखल घेऊन पुरातत्व विभाग,पुणे यांनी यशवंतराव होळकर वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेकामी आवश्यक कारवाई सुरु केली.  

 सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांनी  यशवंतराव होळकर वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेकामी आवश्यक महसूल दस्तावेज मिळणेबाबत तहसीलदार,खेड जिल्हा पुणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती . त्या मागणीनुसार तहसीलदार खेड यांच्याकडून महसुली दस्तावेज ,पुरातत्व विभाग,पुणे कार्यालयास प्राप्त झाले त्यानुसार पुरातत्व विभाग,पुणे यांनी किल्ला संरक्षित स्मारक करण्याकरिता आवश्यक असलेले दस्तावेज एकत्र करून एक प्रस्ताव  पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर केला आहे असे लेखी पत्र सहाय्यक संचालक  पुरातत्व विभाग,पुणे यांनी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांना दिले आहे  . त्यामुळे धनगर प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आले असून वाफगाव किल्ला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 555 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.