ठाण्यातील किसननगर येथे २४ तास लसीकरण केंद्रावर मोहीम सुरू करा- काँग्रेसची मागणी

ठाणे – ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ येथील लसीकरण केंद्रावर लसीच्या डोसची संख्या वाढविण्या बरोबर तेथे चोवीस तास लसीकरण केंद्रावर मोहीम सुरु करण्याची मागणी काँग्रेसचे ठामपा माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर यांनी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे या शाळेत प्रशस्त जागा सोयी सुविधा पाहता २४ तास लसीकरण केंद्र सुरू करता येऊ शकते असेही घाडीगांवकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

वागळे इस्टेट येथील किसननगर ३ मधील ठामपाच्या शाळा क्रमांक २३ मध्ये कोरोना रोखण्यासाठी लसीकरण केंद्र चालू सुरू केले आहे. या सुसज्ज लसीकरण केंद्रामध्ये असलेल्या चार हजार चौरस फुट हॉलमध्ये कोरोना सुचनाचे पालन करीत किमान ५०० नागरिक आणि तळमजल्यावरील पॅसेज मध्ये ३०० नागरिक सुरक्षित अंतर ठेवून बसु शकतात. सध्यस्थितीत  या केंद्रात देण्यात येणारे ३०० लसीचे डोसमुळे तिथे होणारी स्थानिक नागरिकांची गर्दी पाहता अत्यंत कमी आहेत. सद्यस्थितीत किमान रोज ६०० डोस केंद्रावर देण्याकरीता सबंधिताना आदेश द्यावेत. तसेच या केंद्रा मधील प्रशस्त जागा सोयी सुविधा पाहता येथे २४ तास लसीकरण केंद्रावर मोहिम सुरू करावी अशी मागणी केली आहे. ज्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दोन्ही लाटेत कोरोना हॉटस्पॉट ठरलेला हा परिसर भविष्यात कोरोना लागण / प्रसारपासून लवकरात लवकर अलिप्त ठरू शकतो. हजारों नागरिक यामुळे कोरोनाच्या पुढील सर्व येणाऱ्या लाटाचा मारा रोखणेकरिता सज्ज होतील.त्यामुळे याबाबत तातडीने पावले उचलावी,अशी ही मागणी घाडीगांवकर यांनी केली आहे. 

 539 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.