दिव्यात ट्रॅफिक वॉर्डन नियुक्तीची गरज – भाजपची मागणी

ठाणे – शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी व बेशिस्त वाहन चालकांसोबत दिव्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिवा शहरात तातडीने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करणेत यावेत अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी पालिका आयुक्त व वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी पालिका व पोलिसांकडून कोणतीही यंत्रणा उभारण्यात आलेली नाही.दिवा शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लागण्यासाठी दिवा शहरात वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्यात यावेत,यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालताना कोणतीही भीती राहणार नाही. वाहतूक कोंडी सुद्धा होणार नाही असे पाटील यांनी पालिका आयुक्त व पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

भाजपने याआधीच अनेक वेळा आपणाकडे याबाबत विनंती केली आहे,दिवा शहरातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन,त्याच बरोबर दिवा शहरात सायंकाळी व सकाळी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आपण तातडीने शहरातील स्टेशन परिसर,दिवा टर्निंग,गणेश नगर ,व मुंब्रा देवी कॉलनी,साबे गाव येथे वाहतूक पोलीस यांच्या नियंत्रणाखाली ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे.दिव्यातील रस्त्यांना अद्याप दुभाजक नाहीत.त्यामुळे वाहन चालकांच्या चुकांमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असते.दिवा शहराची गरज म्हणून आपण तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती  पाटील यांनी केली आहे.

 306 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.