विश्वास संस्थेच्या दुसऱ्या शिबिरात आणखी ८०० तरुणांचे लसीकरण

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व  कु. वृषाली वाघुले यांचा उपक्रम

ठाणे – विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व कु. वृषाली वाघुले यांनी आयोजित केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांच्या सलग दुसऱ्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ८०० हून अधिक तरुण-तरुणींना लस देण्यात आली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात तयारी केली जात असतानाच, नागरीकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. मात्र, १८ ते ४४ वयोगटातील तरुण-तरुणींना लस उपलब्ध होत नव्हती. ते लक्षात घेऊन विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पार पडलेल्या पहिल्या लसीकरण शिबिरात १ हजार नागरीकांचे लसीकरण करण्यात आले होते. ठाण्यातील नागरीकांची मागणी लक्षात घेऊन सोमवारी २१ जूनपासून दोन दिवसांचे आणखी एक शिबिर घेण्यात आले. त्यात ८०० तरुण-तरुणींना लस देण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे आमदार निरंजन डावखरे व इंडो स्कॉटीश स्कूलच्या प्राचार्या रुची हजेला यांच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमाला दोघांनीही शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वास सामाजिक संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे कौतूक केले.

 446 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.