माजी मंत्र्यांसह ७० जणांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

डोंबिवली  –  लोकनेते आदरणीय स्वर्गीय दि.बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी सर्वच स्तरांवर बैठका झाल्या. ठाणे–रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचीही अशीच मागणी आहे.यासाठी २४ जून रोजी सिडको भावनांवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.कोरोना काळात कायद्याचे उल्लंघन होऊ नये आणि कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कॉम्रेड काळू कोमास्कर, काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे,संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांसह ७० जणांना १४९ कलमाव्ये नोटिसा बजावल्या आहेत.कोरोना काळात इतक्या मोठ्या संख्यने जमा होऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती  सहाय्यक पोलीस निरीक्षक जय मोरे यांनी दिली.तसेच आंदोलनकर्ते आपल्या खाजगी वाहनांनी सिडकोला जाऊ शकतात,त्यामुळे त्यांना अटकाव होणार नाही.तर डोंबिवलीत भाजप पदाधिकारी शांततेच्या मार्गाने जमा होणार असून तेथून सिडकोच्या दिशेने निघणार आहेत.शहरातील वातावरण बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाहतूक पोलिसही वाहतुक व्यवस्थेवर परिमाण होणार नाही यासाठी लक्ष ठेवून आहेत.दरम्यान या आंदोलनात आमदारांना पोलिसांनी नोटिसा बजावल्याबाबत विचारले असता पोलिसांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.तर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही सिडकोकडे निघणार असल्याचे सांगितले.

 138 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *