२७ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम सुरु 

मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ  तालुक्यात २७ जून रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

ठाणे –  ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले आवाहन

ठाणे – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवार दिनांक २७ जून २०२१ रोजी ठाणे जिल्हा अंतर्गत  मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ येथे उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस अवश्य पाजावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले आहे.

 ग्रामीण भागात एकूण १०६९२४ लाभार्थी ० ते ५ वयोगटातील अपेक्षित असून एकूण १०९७ बुथ व १२७ मोबाईल बुथवर २५५३ कर्मचारी व २३२ जिल्हा व तालुकास्तरीय पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. कोविड -19 साथरोग कालावधीत कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा वापर करून ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी दिली.

 361 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.