ठाणे जिल्हा परिषदे मार्फ़त ग्रामीण भागातील लहान मुलांची आरोग्य तपासणी

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

ठाणे – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ग्रामीण भागातील  अंगणवाडीतील मुलांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आरोग्य आणि महिला व बाल विकास विभागाला दिले आहेत. त्यानुसार सबंधित विभागाने मुलांची आरोग्य तपासणी सुरु केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आणि जिल्हा कार्यकारी अधिकारी ( महिला व बाल विकास ) संतोष भोसले यांनी दिली.

सध्यस्थितीत कोविड१९ साथरोगाच्या कालावधीमध्ये प्रत्येक्ष अंगणवाडीत मुलांना प्रवेश नसला तरी अंगणवाडी सेविका मुलांना सेवा देत आहेत. जेंव्हा अंगणवाडी सुरु असते तेंव्हा या मुलांची  नियमित आरोग्य तपासणी केली जाते. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना असणारा धोका नियंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम प्राथमिक स्तरावर मुलांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे बालविकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुलांची आरोग्य तपासणीचे नियोजन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने कार्यवाही सुरु करण्यात आली असून आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय टीम मुलांच्या घरी जाऊन आरोग्याची तपासणी करत आहे. तपासणी दरम्यान मुलाला आजाराची लक्षण दिसल्यास त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात संदर्भित केले जात आहे.

 633 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.