ठाण्यातील आपला दवाखाना व्हेंटिलेटरवर

आपला दवाखान्याची जागा हडपली प्रयोगशाळेने

ठाणे – ठाण्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळावी ह्या उद्दिष्टाने सत्ताधारी पक्षाने सुरू केलेला आपला दवाखाना प्रकल्प आता संपुष्टात आला आहे. दिल्लीच्या मोहल्ला क्लीनिक या संकल्पनेवर आधारीत ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी आपला दवाखान्याची संकल्पना राबविली. पन्नास दवाखाने चालू करण्याचे काम ठेकेदाराला देऊन सुद्धा गेल्या दोन वर्षापासून १५ दवाखाने सुद्धा उघडले नसल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी निदर्शनास आणली आहे.

ठाणे शहरामध्ये २६ लाख लोकसंख्या असून केवळ तीस आरोग्य केंद्र व २ सरकारी रुग्णालय सोडले तर प्रशासनाकडून कुठलेही आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा नाही. करोना काळात ठाणे शहराती जर ५० आपले दवाखाने कार्यन्वित झाले असते तर अनेकांना याचा आधार मिळाला असता. पण प्रशानाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षांत आपला दवाखाना पूर्णपणे सुरू झालाच नाही. ठाण्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या  उद्दिष्टाने सत्ताधारी पक्षाने सुरू केलेला हा प्रकल्प जवळजवळ संपुष्टात आला आहे. दिल्लीच्या मोहल्ला क्लीनिक या संकल्पनेवर आधारीत हा प्रकल्प ठाणे शहरामध्ये विविध झोपडपट्टी असलेल्या परिसरात  कार्यरत होणार होता.परंतु गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकीय घोटाळ्यात अडकलेला हा प्रकल्प सुरळीत चालू झाला . ठाण्यामध्ये आपला दवाखाना  जनतेच्या सेवेसाठी आहे कि राजकीय जाहिरातबाजी साठी असा सवाल उपस्थित होतो. काही राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या  आपल्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी याचा उपयोग करत असल्याचा आरोपही महिंद्रकर यांनी केला आहे.

या प्रकल्पाच्या अंतर्गत रुग्णांना मोफत औषध उपचार तसेच ईसीजी, यूरिन टेस्ट तसेच ब्लड शुगर टेस्टिंग या सोई मोफत करून दिले जाणार होत्या तसेच प्राथमिक औषधोपचारही मोफत देण्यात येणार होते.  यासाठी महानगरपालिका प्रति रुग्णाच्या मागे दीडशे रुपये दर ठेकेदाराला देणार होती व दररोज १०० रुग्णांची चाचणी औषध उपचार ठेकेदाराकडून करणे अपेक्षित होते पण तसे अद्यापही झाले नाही.  प्रायोगिक तत्वावरील दोन दवाखाने सुरू केले, पण काही महिन्यातच ही संकल्पना फसल्याचे पुढे आले. मात्र तरीही ठाणे महापालिकेने रेटून आणखी ५० दवाखाने उभारण्याचा घाट घातला. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्य हस्ते उद्घाटन झालेल्या आपला दवाखाना याचा कब्जा खासगी प्रयोगशाळेने घेतलेला आहे. येथे लोकांकडून पैसे घेऊन करोनाची चाचणी केली जात आहे.  आपला दवाखान्यामध्ये  सुरू असलेल्या प्रयोगशाळेतील लोकांकडून राजकीय जाहिरातबाजी देखील सुरू असल्याचे महिंद्रकर यांनी सांगितले.

दरम्यान मेड इन गो आणि इंद्रायणी  या कंपनीला या प्रकल्पाचा ठेका देण्यात आला असून यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून या कंपनीने वन रूपी क्लिनीकचे डॉ. राहूल घुले यांना केले आहे. पण महापालिकेने आपला दवाखान्याची बिले गेल्या सहा महिन्यांपासून या ठेकेदारांना  दिली नसल्याचे सांगण्यात आले.

एकूण दीडशे कोटी रुपयेचा असलेला हा प्रकल्प ठाणेकर नागरिकांना कधी व्यवस्थित सेवा देईल याची सर्वसामान्य नागरिक वाट बघत आहेत.

आपला दवाखाना हा प्रकल्प फक्त कागदावर असून गेल्या २ वर्षा पासून या प्रकल्पाची कुठली ही ठोस कामे झालेली नाही ठाणे शहरात जर हे दवाखाने सुरू झाले नाही, तर महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू – स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग 

 70 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *