वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

ठाणे  – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  वाहनचालकांवर फेब्रुवारी 2019 पासुन ई चलान प्रक्रीयेद्वारे दंड आकारण्यात येत आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर माहे डिसेंबर 2020, व जानेवारी 2021 दरम्यान प्रलंबित ई चलान संदर्भात विशेष मोहीम घेवुन दोन महिन्यामध्ये 6 कोटी 25 लाख रुपये वसुल करुन शासन जमा करण्यात आला होता.

सद्या लोकल ट्रेन नागरीकांसाठी बंद असल्याने रस्त्यावरील वाहतुक मोठया प्रमाणात वाढली असुन रहदारीच्या नियमांचे मोठया प्रमाणात उल्लंघन होत आहे. वाहतुक नियमांचे वेळोवेळी उल्लंघन करुन 10000 किंवा त्यापेक्षा अधिक दंड प्रलंबित असलेल्या बेदारक वाहनचालकांवरील प्रलंबित दंड वसुल करणेबाबत विशेष मोहीम सुरु करण्यात आली असुन त्यामध्ये MH04 व MH05 नोंदणी क्रमांक असलेली वाहने अनुक्रमे ठाणे व कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातुन नोंदणी केली जातात. यामध्ये  MH04 नोंदणी क्रमांक असलेली 3105 वाहने व MH05 नोंदणी क्रमांक असलेली 346 वाहने अशी एकुण 3451 वाहनांवर 10000 किंवा त्यापेक्षा जास्त दंड प्रलंबित असुन त्यापैकी 1269 वाहनमालकांचे सद्याचे पत्ते ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील आहेत.
ज्या 1269 वाहनधारकांचे पत्ते ठाणे आयुक्तालयातील आहेत त्यांचे वाहतुक उपविभाग निहाय वर्गीकरण करण्यात आले असुन सदर वाहन मालकांच्या घरी प्रलंबित दंडाची रक्कम भरणेबाबत नोटीस घेवुन वाहतुक शाखेचा कर्मचारी पाठविण्यात येत आहे.

ब-याच वाहनमालकांना त्यांच्या वाहनावर प्रलंबित असलेले चलान माहीत नसते किंवा काहींना माहीत असुनही जाणीवपुर्वक वाहतुक नियमांचे उल्लंघन केले जाते. वरीलपैकी दंड न भरण्याचे नक्की कारण माहीत करुन घेवुन भविष्यात वाहतुक नियमांचे पालन करणेबाबतची समज देवुन दंड वसुल करणेसाठी वाहतुक शाखेचा कर्मचारी अशा वाहनधारकांच्या घरी नोटीस देणेसाठी व दंडाची रक्कम जागेवर भरुन देताना वाहनधारकांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन केलेबाबत पुरावे प्रत्यक्ष दाखविण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.

नागरीकांनी प्रलंबित ई चलानची रक्कम तात्काळ ॲानलाईन भरणेसाठी www.mahatrafficechallan.gov.in  या वेब साइट वर किंवा पेटीएम ॲप किंवा mahatraffic app किंवा वाहतुक कर्मचारी यांचेकडील ई चलान मशिनवर किंवा जवळच्या वाहतुक चौकीवर प्रत्यक्ष जावुन भरावे असे आवाहन वाहतुक शाखेमार्फत करण्यात येत आहे.

 364 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.