आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कार्डियाक रूग्णवाहिकांचे लोकार्पण

आमदार निधीतून १ कोटी रूपये खर्च करून ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कार्डियाक रूग्णवाहिकांचे लोकार्पण

ठाणे  – आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी दोन-दोन कार्डियाक अँब्युलन्स आपल्या आमदार निधीतून महानगरपालिकेला सुपुर्त केलेल्या आहेत. या वर्षी सुध्दा आपल्या आमदार निधीतून १ कोटी रूपये खर्च करून कार्डियाक अँब्युलन्स बरोबरच मोक्षरथाची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता कार्डियाक अँब्युलन्स मध्ये लहान मुलांना लागणारे ऑक्सिजन सिलेंडर तसेच घरातून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लागणारी वैद्यकिय उपकरणे असणार असून रूग्णांच्या सेवेसाठी नर्स व डॉक्टरांची सुध्दा मोफत सुविधा असणार आहे.

रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर रुग्णांलयातून किंवा घरातून स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी अँब्युलन्समधून तर कधी-कधी खाजगी वाहनातून ही मृतदेह न्यावा लागतो. त्यातही अँब्युलन्समधून किंवा खाजगी वाहनातून कोरोनाने मृत झालेल्या रूग्णास स्मशानभूमी मध्ये नेल्यानंतर त्या गाडीचे योग्य प्रकारे सॅनिटायझरिंग न केल्यामुळे इतर लोकांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी मोक्षरथाची सुविधा देण्यात आली असून मोक्षरथासाठी मृतांच्या नातेवाईकांनी महानगरपालिकेला कळविल्यानंतर शववाहिकेची महानगरपालिकेतर्फे मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधीने मृत्यू झालेल्या व्यक्तीस अंत्यसंस्कारासाठी गावी किंवा इच्छित स्थळी घेऊन जायचे असल्यास मोक्षरथाचा उपयोग होऊ शकतो. या गाडीमध्ये लांब पल्यासाठी शव नेण्याकरीता बर्फाच्या पेटीच्या जागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आमदार निधीतून १ कोटी रूपये खर्चून कार्डियाक रूग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा आज दि. १९/०६/२०२१ रोजी लोकमान्य नगर येथील निर्मलादेवी चिंतामणी दिघे रूग्णालयात आयोजित करण्यात आला असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेला सुपुर्त केल्या.

या प्रसंगी नगरसेविका परिषा सरनाईक, युवा सेना सचिव-नगरसेवक पुर्वेश सरनाईक, लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्षा आशा संदिप डोंगरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. दिनेश शेंदारकर, डॉ. वैशाली पालांडे, डॉ. अतुल जाधव, डॉ. निगम, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, सामाजिक कार्यकर्ते संदिप डोंगरे, भगवान देवकाते, यावेळी शिवसेना महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

 370 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.