म्युकरमायक्रोसिस इंजेक्शन चा काळाबाजार करणारे तिघे अटकेत

ठाणे – म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजारावर परिणामकारक असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून विक्री करता आणलेले चौदा इंजेक्शन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई कापूरबावडी पोलीस स्टेशन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निखील पवार, अमरदीप सोनावणे  आणि प्रग्णोशकुमार पटेल अशी आहेत.

अ‍ॅम्फोटेरेसीन-बी या इंजेक्शनची दुप्पट दराने विक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत कापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने कापूरबावडी चौकात सापळा रचून निखील आणि अमरदीप या दोघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह््याची कबूली दिली. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून १४ इंजेक्शन जप्त केले. दोघेही हे इंजेक्शन प्रग्नेश कुमार याच्याकडून घेत होते. त्यानंतर पोलिसांनी प्रग्णेशकुमार पटेल यालाही शनिवारी अटक केली. तिघेहीजण हे इंजेक्शन मूळ किमतीच्या दुपटीने विकत असल्याची माहिती समोर येत आहे.

 1,536 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.