मिल्खा सिंह फ्लाईंग सिख  यांचं निधन ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

नवी दिल्ली : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे  निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास  घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे  निधन झाले. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख (Flying Sikh) नावाने प्रसिद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

मिल्खा सिंह यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगडच्या PGI रुग्णालयत भरती करण्यात आले. ऑक्सिजन लेव्हल ५६ पर्यंत गेली होती.  आणि काल १८जुलै २१ रोजी रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच आठवड्यात पत्नीचे निधन झाले होते. परंतु आयसीयूमध्ये असल्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना उपस्थितीत राहता आले नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निधनानंतर दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “एक महान खेळाडूला आज गमावले आहे. मिल्खा सिंह यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक त्यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला दु:ख झाले”.

मिल्खा सिंग यांच्या कुटुंबाने सांगितलं, “मिल्खा सिंग यांचा १८ जून २०२१ रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी मृत्यू झाल्याचं सांगताना आम्हाला अत्यंत  दुःख होत आहे. त्यांनी कोरोनाला कडवी झुंज दिली. निर्मलाजी यांच्या मृत्यूनंतर मिल्खाजींचा अवघ्या ५ दिवसांनी मृत्यू होणं हे त्या दोघांमधील खरं प्रेम दर्शवतं.”

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची प्रेम कहाणी?

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर खेळाच्या मैदानावर झाली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्टी सुरु झाली. विशेष म्हणजे याआधी मिल्खा सिंग यांचे अनेक मुलींसोबतच्या प्रेमाच्या चर्चाही गाजल्या होत्या. मिल्खा सिंग यांचं नाव एक किंवा दोन नव्हे तर तीन मुलींसोबत जोडलं केलं आणि त्यांच्या प्रेमाचे किस्सेही चर्चिले गेले होते. मात्र, यापैकी कुणाशीही त्यांचं लग्न झालं नाही. कारण त्यांचं मन जडलं होत निर्मला कौर यांच्यावर. 

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर १९५५ रोजी कोलंबोला झाली होती. तेथे एका उद्योगपतीने भारतीय खेळाडूंसाठी डिनर आयोजित केला होता तेथेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले. तेव्हा त्यांनी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिल्याचाही किस्सा सांगितलाय.

मिल्खा सिंग यांचं नाव मोठं झालेलं असलं तरी निर्मला कौर या हिंदू आणि मिल्खा सिंग शिख असल्यानं निर्मला कौर यांच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा आला. यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.

 मिल्खा सिंह यांची कारकीर्द   

फ्लाईंग सिख मिल्खा सिंह १९६० साली रोम ऑलिम्पिकमध्ये झालेल्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होते.

  • २०० मी आणि ४०० मी धावण्याच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व
  • १९५८ च्या कार्डिफ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक
  • अ‍ॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू  
  • आशियाई स्पर्धेत ४ सुवर्णपदक 
  • १९५६, १९६०  आणि १९६४  सालच्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व 
  • १९६० च्या रोम ऑलम्पिकच्या ४०० मी च्या अंतिम सामन्यात थोडक्यात पदक हुकलं 
  • १९५९ साली पद्मश्री  पुरस्काराने सन्मान

मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं २० मे रोजी समोर आलं होतं. ते चंदीगडमध्ये आपल्या घरी आयसोलेट होते. मात्र त्यांना २४ तारखेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहालीच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.  माहितीनुसार सर्वात आधी मिल्खा सिंह यांच्या एका हेल्परला ताप आला होता. त्यानंतर मिल्खा सिंह यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मिल्खा सिंह यांनी स्वत:ला घरात क्वारंटाईन केलं होतं.  

 437 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.