सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे – ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात सुरु असलेल्या सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामाची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली.

महापालिका डॉ. विपिन शर्मा यांनी आनंदनगर चेक नाका, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका तसेच एलबीएस मार्ग येथील सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी केली.

यावेळी पावसामुळे रस्त्याच्या बाजूला साचलेला कचरा, माती तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. दरम्यान एलबीएस मार्गावरील रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करून पावसाचे प्रमाण कमी झाले झाल्याने पेव्हरब्लॉक पद्धतीने तात्काळ रस्ता करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.

यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब चव्हाण, कार्यकारी अभियंता चेतन पटेल आदी उपस्थित होते.

 325 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.