ठाणे – ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेला सततचा भ्रष्टाचार व कंत्राटदारांच्या केलेल्या लाडामुळे महापालिकेवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन वसंत डावखरे यांनी व्यक्त केली आहे. तब्बल २५ वर्ष महापालिकेत सत्तेची सर्वोच्च पदे भोगणाऱ्या शिवसेनेने `कुठं नेऊन ठेवलीय, ठाणे महापालिका, असा सवालही डावखरे यांनी केला आहे.
एकेकाळी वैभवशाली असणाऱ्या ठाणे महापालिकेने १ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभार व सततच्या भ्रष्टाचारामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. नालेसफाईच्या नावाखाली `हात की सफाई’ व कंत्राटदारांचे विनाकारण लाड करण्यात आले. नागरिकांकडून जमा केलेल्या करातून ठाणेकरांना सवलती देण्याची अपेक्षा असताना, पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या चैनीसाठी नवीन गाड्यांची खरेदी केली. गरज नसलेला खर्च करीत सत्ताधाऱ्यांनी महापालिकेवर आर्थिक बोजा टाकला. त्यामुळे कर्ज काढण्याच्या परिस्थितीसाठी सर्वस्वी सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
555 total views, 1 views today