रेवदंडा – रेवदंडा समुद्रात मुंबईवरून जेएसडब्ल्यू कंपनीकरिता येणारे मंगलम नावाचे कार्गो शिप एका बाजूला कलंडले होते. या जहाजावर 16 खलाशी होते व त्यांना रेस्क्यू करण्यासाठी मुरुड वरून कोस्ट गार्ड टीम आली होती. इंडियन कोस्ट गार्ड विभागाने हेलिकॉप्टरमधून बचाव कार्य करीत सर्व 16 खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश मिळविले आहे,अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन लेपांडे यांनी दिली आहे.
442 total views, 1 views today