१८ वर्षावरील दिव्यांगांसाठी दर शुक्रवारी विशेष लसीकरण मोहीम

लसीकरणाचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन

ठाणे – ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने १८ वर्षावरील दिव्यांगांसाठी दर शुक्रवारी सकाळी ११ ते २.०० या वेळेत प्रभाग समितीनिहाय विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून दिव्यांग बांधवानी लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

 ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण मोहिमेंतर्गत शहरातील सर्व दिव्यांग बांधव लसीकरणापासून वंचित राहू नयेत तसेच त्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रावर लस घेता यावी यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी दिव्यांग बांधवाना सहज ये-जा करता येईल अशाच प्रभाग समितीनिहाय आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.  

यामध्ये शीळ आरोग्य केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कौसा स्टेडियम, कोरस आरोग्य केंद्र, रोझा गार्डेनिया, आपला दवाखाना आनंदनगर, सीआर वाडिया, श्रीनगर मॅटर्निटी तसेच पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर दर शुक्रवारी सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.  दिव्यांगांना त्यांचे अपंग ओळखपत्र दाखवूनच लस घेता येणार आहे. तरी दिव्यांग बांधवानी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

या विशेष मोहिमेकरिता चिकित्सक मानसशास्त्रज्ञ विशेष शिक्षक आधार कुलकर्णी यांची दिव्यांग लसीकरण मोहीमेचे समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून  लसीरकरणाबाबत काही शंका असल्यास या 09167253130 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे या आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

 314 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.