ठाणे – कला संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने व सफायर हॉस्पिटलच्या सहकार्याने आणि नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने भव्य कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. 15 जून 2021 रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 7 या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिरात खारीगांव, पारसिक नगर, आनंद विहार, सह्याद्री सोसायटी, जय त्रिमूर्ती, एनएमएम सोसायटी आदी परिसरातील 1000 नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा लाभ घेतला.
शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील, नगरसेवक उमेश पाटील, राकेश पाटील, रचना राकेश पाटील, गजानन पवार, प्रभाकर पवार, रविंद्र पाटील, महेश गवारी, गणेश बोऱ्हाडे, विजय पाटील, दुर्गेश चाळके, मनोज पाटील, सिकंदर केणी, अर्चना पाटील, सचिन चव्हाण, गजाजन शिंदे, देसाई काका, अमित खांडेकर, अॅड. अश्विन बोराडे, संदिप पाटील, विजय पाटील, सचिन पाटील, महेंद्र पाटील तसेच राजपूत मित्र मंडळ सदस्य, साधना विद्या मंदिरचे कर्मचारी आदि यावेळी उपस्थित होते.
410 total views, 1 views today