ठाणे – डोंगरीपाडा, पातलीपाडा या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी याच परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी स्थानिक नगरसेवकांसह, शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती. यासाठी पातलीपाडा येथे असलेल्या महापालिकेच्या जागेची पाहणी करुन येथे लसीकरण केंद्र सुरू करणेबाबत महापौरांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार आज पातलीपाडा हिरानंदानी इस्टेट रोडवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू झालेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, स्थानिक नगरसेविका अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. खुशबू टावरी, विभागप्रमुख मुकेश ठोंबरे, शाखाप्रमुख संजय मोरे, संदिप दळवी, दिपक साळवी, महेंद्र देशमुख, कृष्णा म्हात्रे, महेंद्र मढवी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
कोविड 19 अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रात सर्वत्र लसीकरण मोहिम सुरू आहे. परंतु डोंगरीपाडा, पातलीपाडा हा परिसर बहुतांश झोपडपट्टी विभाग असून येथील नागरिक हे विशेषत: आदिवासी समाजातील आहे, या नागरिकांचे देखील प्राधान्यक्रमाने लसीकरण होणे गरजेचे असल्याने या विभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील यांच्यासह विभागप्रमुख मुकेश ठोंबरे, शाखाप्रमुख संजय मोरे, दिपक साळवी, कृष्णा पाटील यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती. पातलीपाडा येथील महापालिकेची जी जागा अन्नछत्रासाठी देण्यात आली होती. या जागेत अन्नछत्र सुरू नसल्याने सदरची जागा महापालिकेने पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. या जागेची पाहणी महापौर नरेश म्हस्के यांनी स्वत: करुन त्या ठिकाणी लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
या लसीकरण केंद्रावर दिव्यांग बांधव, तसेच 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. तरी या परिसरातील दिव्यांग बांधव तसेच नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. या लसीकरण केंद्रामुळे डोंगरीपाडा, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार असल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी महापौरांचे आभार व्यक्त केले. स्थानिकांच्या मागणीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांत या ठिकाणी ताप, सर्दी, खोकला आदी प्राथमिक आजारांवर देखील या ठिकाणी उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी जाहीर केले. तसेच आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तातडीने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त केले.
405 total views, 1 views today
