ठाणे – आरटीई प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे त्यांनी संबधित शाळेत जाऊन दिनांक ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये.सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे.असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संतोष भोसले यांनी केले आहे.
वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ.१ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे.यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपातील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ रोजी लॉटरीची प्रक्रीया राज्य स्तरावरून पुर्ण करण्यात आली आहे.या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण ९०८८ अर्जांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या बालकांच्या पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल.परंतू पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.तसेच प्रवेश घेण्यासाठी बालकांना सोबत नेऊ नये.
410 total views, 2 views today