खाजगी लसीकरण केंद्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांने पलावा, खोणी फेज – २ आणि डोंबिवली पलावा एक्सपिरिया मधील लोढा वर्ल्ड स्कूल येथे लसीकरण केंद्र सुरु

पलावा, खोणी फेज – २ आणि डोंबिवली पलावा एक्सपिरिया येथील लोढा वर्ल्ड स्कूल येथे सशुल्क लसीकरण केंद्र

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील खाजगी सोसायट्यांमध्ये खाजगी माध्यमातुन सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते, त्याचअनुषंगाने कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड १९ लसीकरणाला अधिक गती मिळावी व कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचीत राहू नये याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांने पलावा, खोणी फेज – २ आणि डोंबिवली पलावा एक्सपिरिया येथील लोढा वर्ल्ड स्कूल येथे सशुल्क लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून आज पहिल्याच दिवशी २००० च्या आसपास नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.  लोढा, पलावा ग्रुप मधील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ सहजपणे लस घेता यावी याकरिता कल्याण लोकसभा मतदार संघातील पलावा, खोणी फेज २ व डोंबिवली पलावा एक्सपिरिया येथील लोढा वर्ल्ड स्कूल येथे नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आले आहे.

कोरोना संकंटाशी लढा देताना लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणावर लसीकरण व्हावे, यासाठी कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रात लसीकरण मोहिम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहून पुढाकार घेत पलावा खोणी फेज -२ येथील लोढा वर्ल्ड स्कूल येथे SRCC Children’s Hospital आणि वन रुपी क्लिनिक यांच्या माध्यमातून तर डोंबिवली पलावा एक्सपिरिया मॉल येथील लोढा वर्ल्ड स्कूल मध्ये सुराना ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि निऑन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हे सशुल्क खाजगी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर लसीकरण केंद्र पुढील ४ दिवस सुरु राहणार असून प्रत्येक दिवशी २००० हून अधिक नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

या लसीकरण केंद्रासाठी पुढाकार घेणाऱ्या एलएसजी सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे कौतुक केले आणि कोव्हीड लस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीस आजतागायत मोठ्या प्रमाणात त्रास झालेला नसून ही लस पूर्णत: सुरक्षित आहे याची नोंद घेऊन नागरिकांनी अवश्य कोव्हीड लस घ्यावी असे आवाहन यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले. लसीकरण केंद्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल पलावा खोणी फेज -२ व डोंबिवली पलावा मधील रहिवाशांनी यावेळी खा.डॉ. शिंदे यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेश मोरे, पंचायत समिती उप सभापती किरण ठोबरे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत ठोबरे, ग्रामपंचायत उप सरपंच योगेश ठाकरे, आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

 512 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.