कॉंग्रेस कार्यकर्ते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर आणि बाबा रामदेव यांचे मुखवटे घालून वाढीव पेट्रोल डिझेलच्या किंतीमच्या विरोधातील आंदोलनात !!
मुलुंड – ईंधनावरील दरवाढ मागे घेण्याची मागणी करत अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर आणि बाबा रामदेव यांचा मुखवटा घालून मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते, मुलुंड येथील पेट्रोल पंपावर, भाजप सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल डीजल किमतीं मध्ये झालेल्या ऐतिहासिक दरवाढीवर सदर महानुभावांचे मौनाचा निषेध केला. २०१४ पूर्वी ह्याच व्यक्ती ईंधन दरांमध्ये किंचित वाढ झाल्यावर लगेच सरकारवर सडकून टीका करीत असत. अलीकडेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या फ़िल्मी स्टार्सनां पत्र लिहून इंधन इंधनाच्या किमतींमध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीवर सोयीस्कर मौनावर प्रश्न उपस्थित केले होते.
उपरोक्त सांकेतिक विरोध प्रदर्शनाचे नेतृत्व मुंबई कॉंग्रेसचे कार्यकारी सदस्य राजेश इंगळे यांनी, जिलाध्यक्ष अब्रहम रॉय मणि, डॉ. आर. आर. सिंह, विट्ठल सातपुते, संतोष सोनवाणे, संजय झा, अनिल सिंह, सतीश सोनवाने, धर्मेश सोनी, राहुल मोर्य, पॉल सायमन, आदीं सह केले.
467 total views, 1 views today
