ठाणे जिल्ह्यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीचे वाटप

महाआवास अभियान – ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ई-गृहप्रवेश कार्यक्रमात  ठाणे जिल्ह्यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीचे वाटप

ठाणे –  महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे ठाणे जिल्ह्यातील पांडू गणपत दरवडा आणि रसिक रवींद्र गायकवाड या आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण भागात महा आवास अभियान गतिमान पध्दतीने राबविण्यात आले. त्यामुळे अभियान काळात प्रधानमंत्री आवास योजनेची ७२८ घरकुल बांधण्यात आली तर राज्य पुरस्कृत योजनेची ५०४ घरकुल बांधून जिल्हाने राज्यात दर्जेदार कामगिरी केली आहे असे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.

 381 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.