ठाण्यातील नाल्यात सापडले नवजात मगरीचे पिल्लू

ठाणे – वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरातील नाल्यास एक दीड ते दोन आठवड्याचे एक लहान मगरीचे पिल्लू सापडले आहे. सध्या हे नवजात मार्श प्रजातीच्या मगरीचे पिल्लू पुनर्वसू फाउंडेशन या वाइल्ड लाईफ वेलफेअर अससोसिएशनच्या निगरानीत आहे. अशाप्रकारे दोन वर्षांपूर्वी त्या नाल्याच्या परिसरात मगरीचे पिल्लू मिळून आले होते. या घटनामुळे ही मगरीची पिल्लू कुठून येतात याचा शोध घेणे गरजेचे आहे. एकतर अशाप्रकरे या मगरीच्या पिल्लांना कोणी तरी आणून सोडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मामा- भाचे डोंगराच्या पायथ्याशी रामनगर हे वसलेले आहे. त्याच परिसरातून जाणाऱ्या नाल्यात स्थानिकांना मगरीचे पिल्लू सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निर्दशनास आले. त्यांनी तातडीने माहिती दिल्यावर पुनर्वसू फाउंडेशन या वाइल्ड लाईफ वेलफेअर अससोसिएशनच्या सदस्यांनी धाव घेतली. तेथे गेल्यावर त्या जिवंत पिल्लाला ताब्यात घेत त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र हे पिल्लू नेमके कुठून आले तसेच त्याला कोणी येथे आणून सोडले असावे अशीच शक्यता आहे. कारण त्या नाल्यात मगर येणे खूप कठीण आहे. त्यातच मासे पकडताना ते पिल्लू जाळ्यात आले असावे ही शक्यता ही नाकारता येत नाही. मार्श या प्रजातीच्या मगरी आपल्याकडे तुलसी तलाव आणि उपवनच्या तलावात आहेत. हे पिल्लू ही त्याच प्रजातीतील आहे. त्या नवजात पाहुण्याची (पिल्लाची) काळजी घेतली जात आहे. डॉक्टरांच्या मदतीने या पिल्ला मागे याच परिसरात सापडलेल्या पिल्लाप्रमाणे या नव्या पिल्ला सोडले जाणार असल्याचे असोसिएशनने सांगितले.

 335 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.