दि. बा. पाटील नावासाठी मागासवर्गीय ओबीसी एकत्र

डोंबिवली – नवी मुंबई येथील नियोजित विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी अनेक जिल्यातील मागासवर्गीय ओबीसी एकत्रित आले असून ही प्रथमच ऐतिहासिक क्रांती घडली आहे असे वक्तव्य दि.बा.पाटील  विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी डोंबिवलीत केले.दिबांच्या नावासाठी येत्या २४तारखेला  सिडको कार्यालयाला धडक  देणार असल्याचा इशाराही दिला.

पूर्वेकडील प्रगती कॉलेज येथील सभागृहात याविषयीची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, जगन्नाथ पाटील, रामशेठ ठाकूर, खासदार कपिल पाटील ,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार किसन कथोरे, आमदार राजू पाटील, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, गुलाब वझे, गंगाराम शेलार, संतोष केणे, जगदीश गायकवाड, अंकुश गायकवाड, प्रल्हाद जाधव, सुरेश पाटील,लक्ष्मण पाटील यांसह इतर राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते , ठाणे ,पालघर, रायगड जिल्ह्यातील समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेमध्ये सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे की २४ जून रोजी सिडको भवन येथे सिडकोचा निषेध म्हणून धडक मोर्चा निघणार आहे. त्या आंदोलनात सर्वांनी महिला शक्ती घेऊन जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचा संकल्प करण्यात आला बाळासाहेबांच्या नावाला विरोध केलाच नाही उलट मुख्यमंत्र्यांनी आदरणीय लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या नावाला विरोध केला आहे. विमानतळ बांधकामासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी ३० टक्के खर्च सिडको करत असते, मग सिडकोने हा पैसा कुठून आणला तर तो पैसा सर्व भूमिपुत्रांनी सिडकोला दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मिळालेला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना सिडकोने यामध्ये विचारात घ्यायलाच पाहिजे होतं. भारताच्या इतिहासात किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात एखादा मुख्यमंत्री स्वतःच्या वडिलांचे किंवा कुटुंबातील व्यक्तींचे नाव देण्याचा प्रयत्न करत आहे हे किती अनाकलनीय गोष्ट आहे असा टोलाही मारण्यात आला. यावेळी कपिल पाटील म्हणाले २०१६  रोजी लोकसभेत विमानतळाला दि.बा.च नाव द्या अशी मागणी केली होती. महाराष्ट्रात हे प्रथमच होत आहे की प्रकल्प होण्यापूर्वीच नांव देत आहेत हे योग्य नाही.
संतोष केणे म्हणाले, राजकारण येणार पण आम्ही स़यमाने घेतो. सनदशीर मार्गाने जाणार आणि संविधानात हक्क दिला आहे. समाज बांधवांवर अन्याय झाला. नेवाली प्रकरणाने समाजाचे खच्चीकरण झाले. अर्जुन बुवा चौधरी म्हणाले, दिबाच मोठं योगदान आहे.
दिबा नावासाठी मागे हटणार नाही. रामशेज ठाकूर म्हणाले, घडक मोर्चा प्रसंगी भूमिपुत्र एकत्रित होऊन लढा देऊ. अटक होण्याची शक्यता घाबरून जायचं काम नाही. मुंबई दिल्ली येथे जाता येईल

 457 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.