ठाणे – आमदार संजय केळकर यांनी मागील आठवड्यापासून संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि खासगी हॉस्पिटल च्या सहकार्याने ठाण्यातील विविध गृह संकुलात लसीकरण मोहीम सुरू केली. त्याला ठाणेकरांचा गृहसंकुलातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. याबाबत त्यांनी ठा म पा आयुक्तांशी चर्चा केली होती.
एकाच दिवशी ठाण्यातील हिरानंदानी मिडोज येथील निहारिका व परिसरातील सोसायटी तसेच श्रीरंग सोसायटी, वृंदावन, ब्रह्मांड, साकेत परिसरातील गृह संकुलात आ. केळकर यांच्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून तसेच सफायर व सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या सहकार्याने लसीकरणाची यशस्वी मोहीम करण्यात आली. यात परिसरातील हजारो नागरिकांचे लसीकरण झाले. विविध परिसरातील स्थानिक नगरसेवक व गटनेते मनोहर डुंबरे, जेष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, नगरसेवक कृष्णा पाटील, नगरसेविका नंदा पाटील, नगरसेविका कविता पाटील, नगरसेविका नेहा आंब्रे लसीकरण मोहिमेत सहभागी झाले होते.
जस जशा लसी उपलब्ध होतील त्याप्रमाणे गृह संकुलात लसीकरण मोहीम सुरू ठेवणार असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.
384 total views, 1 views today