अनधिकृत बांधकामाच्या इमारतींचे प्रदर्शनासाठी परवानगी द्या ठामपा आयुक्तांना पत्र  

परवानगी मिळाल्यास पालिका आयुक्तांच्या हस्ते या अनोख्या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार-घाडीगांवकर

ठाणे – पालिका हद्दीत प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकाम,सहा महिन्यात उभ्या राहिलेल्या इमारती या अनोख्या नगरविकास व गृहनिर्माण धोरणाचे कौतुक व्हावे, अनधिकृत बांधकामे होण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक व्हावे यासाठी सदर बांधकामांचे प्रदर्शन भरविण्यासाठी परवानगी द्या अशी उपरोधक मागणी काँग्रेसचे संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.

पालिका हद्दीत मागील काही वर्षांत राजरोस पणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. कोणतीही प्रभाग समिती हद्द याला अपवाद नाही. पालिका अधिकारी व अतिक्रमण विभाग याकडे तक्रारी करून ही अनधिकृत बांधकामे थांबत नाहीत याचा अर्थ ही बांधकामे होण्यास पालिका अधिकारी प्रोत्साहन देत आहेत. शहराचा चेहरा विद्रुप करणाऱ्या अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामे यांचे प्रदर्शन आपण भरवणार आहोत असे जाहीर करून घाडीगांवकर यांनी पालिकेच्या धोरणाची खिल्ली उडवली आहे.प्रदर्शन भरविण्यासाठी त्यांनी पालिकेकडे जागेची परवानगी मागितली असून परवानगी मिळाल्यास पालिका आयुक्तांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल असे त्यांनी जाहिर केले आहे.

 390 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.