येऊरमधील मोकळे माळरान डेरेदार झाडांनी बहरणार

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनविसेनेकडून ५३ वृक्षांचे रोपण

ठाणे – येऊरमध्ये उघड्याबोडक्या असलेल्या माळरानाला हिरवेगार करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून ५३ वृक्षांचे रोपण करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त डेरेदार झाडांचे रोपण मनविसे, रूद्र व शिवशांती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील मोकळे माळरान डेरेदार झाडांनी बहरणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा केला जात असताना ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, रूद्र व शिवशांती प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले. ताम्हण, वड, आकाशनिम, जांभूळ, शिसव आणि पिंपळ या झाडांची रोपं येऊरच्या माळरानावर आज सकाळी लावण्यात आली. मनविसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण, प्रमोद पत्ताडे, दिपक जाधव, सचिव सचिन सरोदे, विधानसभा सचिव मयुर तळेकर, विभाग अध्यक्ष राकेश आंग्रे, हेमंत मोरे, कृष्णा पोळ, विवेक भंडारे, निलेश वैती, उपविभाग अध्यक्ष प्रसाद होडे, मंदार पाष्टे, सोमनाथ भोईटे, हेमंत गायकवाड, विशाल पाटील, शाखाध्यक्ष प्रितम डूलगच, संदीप पवार, रवी शेदांडे, सचिन चाबुकस्वार, सतिश कांबळे, गोविंद माने, निलेश गायकवाड, ऋषिकेश घुले शुभम मोरे आणि रूद्र व शिवशांति प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंह, रंजीत सिंह, गोपाल ठाकुर आदी उपस्थित होते.

झाडांना लाकडी कुंपणाचे कवच

वन्यजीवांकडून नुकतीच लावण्यात आलेली ही झाडे खाल्ली जाऊ नये अथवा त्यांना हानी पोहोचू नये म्हणून या झाडांभोवती लाकडी कुंपणही लावण्यात आले. येत्या वर्षभर या झाडांची निगा रूद्र, शिवशांति प्रतिष्ठान संस्था घेणार असून भविष्यात अशाच पध्दतीने ठाणे जिल्ह्यातील विविध भागात वृक्षारोपण केले जाईल अशी माहिती यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिली.

 438 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.