माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून गोल्डन गँगचा गौप्यस्फोट

आयएएस अधिकारी जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्याना ५ पानी पत्र देऊन केला खुलासा 

ठाण्याचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर हे आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार

ठाणे – ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र लिहून ठाण्यात चालणाऱ्या ‘गोल्डन गॅंग’ बाबत गौप्यस्फोट केला आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्याच्या लेटर बॉम्बची चर्चा आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ठाण्यात चालणाऱ्या ‘गोल्डन गॅंग’चा खुलासा केला आहे. ज्यात काँग्रेस, एनसीपीसारख्या मोठ्या पक्षांचे आजी माजी नगरसेवक आहेत. संजीव जयस्वाल विरुद्ध काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर असा वाद चव्हाट्यावर आला असून जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित संजय घाडीगांवकर यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार केली आहे.

संजय घाडिगावकरण यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून ठाण्यातील अनधिकृत बांधकामाचा पाढा वाचला होता. आणि दोषींवर कारवाईची मागणी देखील या पात्रात केली होती. या पत्राला उत्तर देताना ठाण्यातील महानगर पालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांनी मुख्यमंत्र्याना ५ पाणी पत्र लिहून घाडीगावकर यांच्या आरोपांचा संचार घेतला आहे. 

या तक्रारी संदर्भात संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्री यांना आपला खुलासा दिला आहे. ज्यामध्ये संजय घाडीगांवकर हे एक खंडणीखोर, ब्लॅकमेलर, गुंड असल्याचा आरोप केला आहे. जयस्वाल यांनी आरोप केली बिल्डर सुरज परमार केसमध्ये अटक करण्यात आलेले चार आरोपी एनसीपी नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत  जगदाळे, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि मनसेचे माजी नेते सुधाकर चव्हाण सोबत संजय घाडीगांवकर गोल्डन गॅंग चालवतो.

ज्यांनी ठाण्यात असताना खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि अनाधिकृत कामे करणारी सक्रिय टोळी पैसे मिळवत होती.  त्यांच्या विरोधात आपण ठाणे आयुक्त असताना कारवाई केली होती. त्यामुळेच संजय घाडीगावकर यांचं नगरसेवक पद रद्द झालं होत. याच गोष्टीचा आकस मनात धरून आपल्या विरोधात खोटी तक्रार केली असल्याचं जैस्वाल यांनी म्हटलं आहे. जयस्वाल यांनी पत्रात ठाण्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांना जयस्वाल यांनी एक पाच पानांचं पत्र लिहिलं आहे. 

या पत्रात त्यांनी आपण ठाण्याचे आयुक्त असताना घाडीगावकर आपल्याला मानसिक त्रास देत होते. मला धमक्या देखील देत होते असं त्यांनी म्हटलं आहे. संजय घाडीगावकर यांच्या विरोधात सविस्तर क्रिमिनल चौकशी करावी अशी मागणी देखील जयस्वाल यांनी पत्रात केली आहे.

 517 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.