कोरोना काळात फिरता दवाखाना ठरणार नागरिकांसाठी वरदान
धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना रुग्णवाहिकेचे ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी लोकार्पण
कल्याण – युवासेना प्रमुख तथा पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील नेवाळी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब फिरता दवाखाना या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून “धर्मवीर आनंद दिघे” तसेच “स्वर्गीय रामचंद्र मढवी” यांच्या स्मरणार्थ फिरता दवाखान्याचे लोकार्पण कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या फिरत्या दवाखान्यामध्ये रुग्णांच्या तपासणीकरिता डॉक्टर आणि परिचारिका असणार असून तपासणीनंतर लागणारी औषधे सुद्धा उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी सर्व यंत्रणा देखील यामध्ये असून यामध्ये ऑक्सिजन मशीन्स, इमर्जन्सी वेळी लागणारी औषधांचा देखील यामध्ये समावेश आहे. याप्रसंगी नेवाळी मा. सरपंच चैनु जाधव, तालुका प्रमुख अशोक म्हात्रे, सहसंपर्क कल्याण पूर्व विधानसभा विजय जोशी, नगरसेवक महेश गायकवाड, श्रीमलंगगड विभागप्रमुख संदीप पाटील, प्रभाकर पाटील, अर्जुन पाटील व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना काळात कल्याण लोकसभा मतदार संघातील एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाची ढाल झालेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गंभीर रुग्णास जिल्हा तथा तालुक्यांबाह्य अन्य ठिकाणी हलविण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जीव वाचविण्याच्या दृष्टीने व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक उपचार त्वरित घेण्याच्या अनुषंगाने आज नेवाळी भागातील ग्रामस्थांसाठी धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना तसेच नेवाळी नाका, हिललाईन पोलीस चौकीसमोर प्राथमिक उपचार घेण्याकरिता दवाखान्याचे लोकार्पण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कार्यरत राहून विविध प्रभावी उपयोजना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण व अंबरनाथ तालुक्यात राबवत आहेत. दरम्यान या काळात घरी असणाऱ्या आपल्या नागरिकांविषयी खा.डॉ. शिंदे यांना तितकीच आर्त काळजी असल्याचे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमातून पाहायला मिळते.
कोरोना काळातील निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या मतदार संघातील नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागून नये याकरिता खा.डॉ. शिंदे यांनी “धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना” उपक्रमाचे आयोजन आजपासून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करण्यात आलेला आहे. फिरता दवाखाना म्हणजेच प्रत्येक गावांमध्ये जाऊन दारोदारी आरोग्य तपासणी करण्यात येणार असून हि सुविधा यापुढेही लोकसेवेसाठी अशाच प्रकारे कार्यान्वित ठेवणार असल्याचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांना सांगितले आहे. या उपक्रमासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मोलाची साथ मिळाल्याबद्दल ग्रामस्थांकडून खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले आहे.
427 total views, 2 views today