ठाणे – बाजारात खरेदीसाठी गेलेल्या चरई येथील रहिवासी असलेल्या केवल बुठेलो या बारा वर्षीय चिमुरड्याला रस्त्यावर साचलेल्या पाण्यात शॉक लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यामध्ये त्याला कोणतीही दुखापत झालेली नसून शॉक लागल्याने तो चिमुरडा घाबरला आहे. हा प्रकार जांभळी नाक्यावरील हनुमान मंदिर जवळ घडला असून इलेक्ट्रिक वायर तुटून रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडली असावी, त्यातून करंट पाण्यात उतरल्याने केवल याला शॉक लागला असावा अंदाज वर्तविला जात आहे. तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती. या घटनेची ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत नोंद आहे. अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
547 total views, 1 views today