हिरानंदानी मेडोज मध्ये एकाच दिवशी 1100 रहिवाशांचे लसीकरण

महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

ठाणे – शहरातील गृहसंकुलांमध्ये अपोलो रुग्णालयाच्या सहकार्याने आज  हिरानंदानी मेडोज येथे लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. या लसीकरणासाठी आज एकूण 1100 नागरिकांनी सहभाग घेतला. या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक मुकेश मोकाशी, शिवाजी पाटील, हिरानंदानी मेडोज रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष ॲड जयदीप ठक्कर आदी उपस्थित होते.

हिरानंदानी मेडोज रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन या गृहसंकुल मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरण सुरू करावे अशी मागणी सातत्याने केली होती. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही खाजगी रुग्णालयाशी संलग्न होवून गृहसंकुलातील लसीकरण सुरू करण्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे  व महापौर नरेश म्हस्के यांनी सतत पाठपुरावा केला होता.

खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने शहरांतील विविध गृहसंकुलांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. हिरानंदानी मेडोज रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन या गृहसंकुल मध्ये  अपोलो रुग्णालयाच्या सहकार्याने  व  दिपक मेजारी यांच्या पुढाकाराने आज लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी 1100 रहिवाशांचे विक्रमी लसीकरण करण्यात आले आहे.

खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरण मोहिम सुरू झाल्यामुळे निश्चितच कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त लसीकरण होवून कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठी मदत होणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील महापालिकेने मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयानी त्यांच्याशी संलग्न होणाऱ्या गृहनिर्माण संकुलातील नागरिकांचे लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले. हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे महापौरांनी कौतुक केले. तसेच कोरोना काळात देखील अपोलो रुग्णालयाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.