नौपाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासात लावला मोबाईल चोरट्यांचा छडा

लॉजचा लपण्यासाठी चोरट्यांनी घेतला 'आसरा', पण तेथून आवळल्या मुसक्या

ठाणे - चोरटे बेरोजगार असल्याने धूम स्टाईलने सहजरित्या मोबाईल चोरीत असताना, बुधवारी अशाच एका ठाण्यातील घटनेत रिक्षातून चाललेल्या मुंबई कलिना येथील कन्मीला रायसिंग या तरुणीचा मोबाईल खेचताना झालेल्या झटापटीत रिक्षातून पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर भिवंडीतील अल्केश (२०) आणि सोहेल अन्सारी (१८) या चोरट्यांनी लपण्यासाठी घरी न जाता, भिवंडीतील एका लॉजचा आसरा घेतला. मात्र , म्हणताना कानून के हाथ लंबे होते है..! तसेच नौपाडा पोलिसांनी त्यांच्या अवघ्या २४ तासाच्या आत लॉजमधूनच मुसक्या आवळल्या. त्या चोरट्यांवर प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून त्यांनी या गुन्ह्याची कबुली देत, आणखी १० ते १२ ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे म्हटले आहे. त्यांना येत्या १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती परिमंडळ १ चे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान हा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या नौपाडा पोलीस पथकाला अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कुंभारे यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मुंबईतील कन्मीला रायसिंग (२७) ही मृत तरुणी ठाण्यातील एका  नामंकीत मॉलमधील स्पा सेंटरमध्ये कामाला होती. ९ जून रोजी ती कामावरून सुटल्यानंतर मॉल समोरील रिक्षा थांबा येथून रिक्षा पकडून घरी जात होती. रिक्षा नाशिक मुंबई महामार्गावरील रोडने जात असताना तीन हात नाका येथे आल्यावर काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून अल्केश आणि सोहेल हे दोघे तिच्या रिक्षाच्या बाजूला आले. त्यांनी रिक्षा बसलेल्या कन्मीला हिच्या हातातील मोबाईल खेचला, यावेळी झालेल्या झटापटीत ती धावत्या रिक्षातून खाली पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारार्थ रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी घटनेचे गंभीर लक्षात घेत, तीन पथके नेमली. यामध्ये पाच अधिकारी आणि १७ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तातडीने सीसीटीव्ही आणि खबऱ्यांकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे त्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले. चोरटे हे काम धंदा काही करत नसून अल्केश याच्यावर कोनगांव तर सोहेल याच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांनी या गुन्हयाची कबुली दिली असून त्या गुन्ह्यातील मोबाईल आणि मोटारसायकल तसेच अन्य चार मोबाईल जप्त केले आहेत. तर त्यांनी आणखी १० ते १२ ठिकाणी असेच गुन्हे केल्याचे सांगत आहेत. त्यानुसार तपास सुरू असून ते गुन्हा घडल्यानंतर तातडीने तीन हात नाका येथून यु टर्न घेऊन भिवंडीकडे पळून गेले. त्याचबरोबर पकडले जाण्याचा भीती ने त्या दोघांनी घरी ना थांबता लॉजमध्ये थांबण्याचा मार्ग अवलंबला होता. मात्र, त्यांचा तो प्रयत्न आणि त्यांना पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकता आली नाही. अखेर पोलिसांनी त्या दोघांना आसरा घेतलेल्या लॉजमधून अटक केली. 

मोबाईल चोरीचे १०० टक्के गुन्हे उघड 

या वर्षात नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा ठेवण्यात यश आले आहे. मोबाईल चोरीचे १०० टक्के तर सोनसाखळी चोरीचे ८० टक्के नौपाडा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

 811 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.