शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार विद्यार्थाना ब्रिज कोर्सद्वारे करावी लागणार उजळणी

कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्यापासून मार्च 2020 पासून महाराष्ट्रात शाळा बंद आहेत

सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत

मुंबई – कोरोना संसर्गाची लागण झाल्यापासून महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील सर्वच शाळा बंद आहेत.सलग दोन  वर्ष विध्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्याचं नाहीत .तर जवळपास १५ महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण सुरु आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमाची प्रगती व उजळणी या ब्रिज कोर्स द्वारे घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ब्रीज कोर्स म्हणजेच उजळणी अभ्यासक्रम घेणार आहे. हा ब्रीज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल.  

का करावा लागणार ब्रिज कोर्स?

महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचं सावट आहे. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्षभराच्या ऑनलाईन शिक्षणाच्या काळात किती कौशल्य विकसित केले आहेत. याची चाचणी ब्रीज कोर्समधून घेतली जाणार आहे.

कसा असेल ब्रिज कोर्स ?

एखादा विद्यार्थ्यी चौथीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असेल तर त्याला शाळा सुरु झाल्यानंतर पहिले ४५ दिवस तिसरीचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. यामध्ये सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाची उजळणी करुन घेतली जाईल. ४५ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयावरील पेपर द्यावा लागणार आहे. हा पेपर गेल्या वर्षीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यातून विद्यार्थ्यानं किती कौशल्य प्राप्त केली आहेत, याची चाचणी घेतली जाईल. ब्रीज कोर्स शाळा सुरु झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे.

गणित विज्ञान विषयाला प्राधान्य 

ब्रीज कोर्समध्ये सर्व विषयांचे पेपर आयोजित केले जाणार असले तरी प्रामुख्यानं गणित आणि विज्ञान विषयावर अधिक भर असणार आहे. तर, सुरुवातीच्या ४५ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची ब्रीज कोर्सच्या माध्यमातून तयारी करुन घेतली जाणार आहे.

सर्व शाळांना बंधनकारक

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ब्रीज कोर्स महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना अनिवार्य केला आहे. महाराष्ट्रातील सीबीएसई आणि इतर बोर्डांच्या शाळांना हा निर्णय लागू नसेल. दुसरी ते आठवीच्या वर्गासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रीज कोर्समधून विद्यार्थ्यांची पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकण्याची क्षमता देखील जाणून घेतली जाणार आहे.

 359 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.