शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत ही तर काँग्रेसला दिलेली धमकी- राणेंचा दावा

शरद पवार बोलले असले तरी ते शिवसेनेबरोबर निवडणूक लढणार नाहीत

त्यांनी एकप्रकारे काँग्रेसला धमकी दिल्याचा दावा नारायण राणे यांनी केलाय

मुंबई – महाविकास आघाडी आगामी लोकसभा आणि विधानसभा  निवडणूक एकत्र लढणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनच्या दिवशी म्हटलं होतं. यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेचं कौतुक देखील केलं होत. ठाकरे आणि मोदी भेटीवर बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचं पवार म्हणाले. यावर भाजपा नेते खा. नारायण राणे यांनी दावा केला आहे. जरी शरद पवार  शरद पवार बोलले असले तरी ते शिवसेनेबरोबर निवडणूक लढणार नाहीत. त्यांनी एकप्रकारे काँग्रेसला धमकी दिल्याचा दावा राणे यांनी केला आहे.    

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणाले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार  कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थ लावायचा असतो”, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसला एकप्रकारे सावधगिरीचा इशारा देखील  दिला आहे. 

 298 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.