पंतप्रधान मोदींकडून मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजाराची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
नवी दिल्ली – मुंबईतील मालाड मालवणी भागात बुधवारी रात्री उशिरा एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांनी घटनास्थळीच आपले प्राण गमावले तर १७ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी यांनीही शोक व्यक्त केलाय. तसंच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आल आहे . मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत दुर्घटनेतील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाल्याचं पंतप्रधानांनी म्हंटल आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो’ असं म्हणत पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई – मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले.अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयात हलवून शासनाच्या खर्चात उपचार करावेत हे निर्देशही दिले
442 total views, 1 views today