कोरोनामुळे ज्या बालकांच्या पालकांचे निधन झाले , अशा बालकांना बाल संगोपन बालगृह योजनेचा लाभ
ठाणे – कोवीड -१९ या रोगाच्या अभुतपूर्व परिस्थिती मध्ये बालकांची काळजी व संरक्षण संबंधीत कार्यतर संस्थांमधील बालकांची सुयोग्य काळजी तसेच कोवीड – १९ च्या रोगामुळे ज्या बालकांचे आई -वडीलांचे निधन झाले आहे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदल स्थापन करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हयातील कोवीड -१९ च्या रोगामुळे ज्या बालकांचे आई – वडीलांचे निधन झाले आहे अशा बालकांचे बाल संगोपन (दरमहा रुपये १,१००/-), बालगृह योजनेचा लाभ तसेच दत्तक बालक या योजनेचा लाभ घेऊ इच्छीत असाल तर आपण चाईल्ड लाईन संपर्क क्र. १०९८ (२४x७), अध्यक्ष / सदस्य, बाल कल्याण समिती, ठाणे – ८७६६४४६५२०, जिल्हा बाल संरक्षण कक्ष -७७०९३५८७७० व राज्यस्तरीय संपर्क क्र. ८३०८९९२२२ / ७४०००१५५१८(सकाळी ८.०० ते रात्री ८.००) वर संपर्क करावा.
दानशुर व्यक्ती काही कालावधीसाठी बालकांचे पालकत्व (foster Care) घेऊ इच्छीत असाल तर आपण सुध्दा वरील क्रमांवर संपर्क करु शकता. अन्य कोणालाही संपर्क करु नका ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.
446 total views, 1 views today